सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरळे ता.सातारा येथे झालेल्या अपघात प्रकरणी पप्पू चित्तरमल कुमावत (वय 32, रा. राजस्थान) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रकाश बाळू नवघणे (वय 35, रा. वासोळे ता.सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 28 ऑगस्ट रोजी ट्रक व दुचाकीचा अपघात झाला आहे.