साताऱ्यातील कोरेगाव पार्क परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एकावर कारवाई

साताऱ्यातील कोरेगाव पार्क परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एकावर कारवाई

सातारा :  येथील कोरेगाव पार्क, सदरबझार परिसरात तोंडाला रुमाल बांधून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एकावर शाहूपूरी पोलिसांनी कारवाई केली. महेश विष्ण खवळे (शाहूनगर, सातारा) असे याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेल्या संशयीताचे नाव आहे. तो गुरुवारी (दि.८) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गुन्हा करण्याच्या अनुंषगाने संशयास्पदरित्या फिरताना आढळल्याने पोलिसांनी कारवाई केली. पोलिस कॉ. विशाल धुमाळ यांनी याबाबत शाहुपूरी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस हवालदार खलिफा हे या घटनेचा अधिक तपास करत आहे.