पालिकेच्या अभय योजनेला मुदतवाढ मिळावी

पालिकेच्या अभय योजनेला मुदतवाढ मिळावी

सातारा : सातारा पालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कराची थकबाकी रक्कम जास्त असते. त्या रकमेचा भरणा आर्थीक अडचणी मुळे वेळेवर होत नाही. यामुळे सातारा पालिकेने मालमत्ता करावरील शासकीय माफी साठी अभय योजना जाहीर केली आहे. 

ही योजना नागरीकांच्या हितासाठी असून ती काही नागरिकांपर्यंत पोहचली नाही. तरी 19 जून पर्यंत म्हणजे खूप कमी कालावधी असून सर्व नागरिकांना याचा फायदा मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे प्रशासनाने मुदत वाढवावी, अशी विनंती असलेले निवेदन उपमुख्याधिकारी यांना संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष रफीक शेख यांनी दिले.

यावेळी तालुका अध्यक्ष आशिष खवळे, सातारा शहर अध्यक्ष अमोल नलावडे, संघटक महेश गराटे, मेहबूब पठाण, प्रदीप खवळे, इम्रान कच्छी, सचिन जाधव, नजीम बागवान, प्रताप जाधव, योगेश पवार आदी उपस्थित होते.