लोखंडी पोलची चोरी

लोखंडी पोलची चोरी

सातारा : लोखंडी पोलची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसवे ता.सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी 96 हजार रुपये किंमतीचे 8 लोखंडी पोल चोरुन नेले. ही घटना दि. 26 ऑक्टोबर रोजी घडली असून याप्रकरणी आदर्शसिंह संतोष बघेल (वय 39, रा.मोळाचा ओढा, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.