सातारा : नालसा (ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर सेवा) योजना २०१६, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी ३. सार्वजनिक उपयुक्तता सेवा आणि केंद्र/राज्य सरकारच्या योजना या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन, मातोश्री वृद्धाश्रम महांगाव, कोरेगाव रोड, सातारा येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य शंकरराव भगत, डॉ. चंद्रकांत नलवडे उपस्थित होते.
श्रीमती बेदरकर यांनी नालसा (ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर सेवा) योजना २०१६ आणि सार्वजनिक उपयुक्तता सेवा आणि केंद्र, राज्य सरकारच्या योजना या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
श्री. भगत यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. नलवडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड काढण्यासाठी नोंदणी केली. तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कायदेविषयक माहितीपत्रके वाटप करण्यात आले.