महिलांच्या विनयभंग प्रकरणी एका पोलिसासह अन्य तीनजणांवर गुन्हा

महिलांच्या विनयभंग प्रकरणी एका पोलिसासह अन्य तीनजणांवर गुन्हा

सातारा : सातारा पोलीस दलात कर्तव्य बजावणार्‍या एका पोलिसासह त्याच्या अन्य तीन मित्रांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा पोलीस दलात सेवा बजावणारा पोलीस त्याच्या मित्रांसह गुटखा, तंबाखू खावून थुंकून घाण करत असताना त्याला एकाने अटकाव केल्यानंतर संबंधित पोलिसाने मुजोरगिरी केली. घाणेरड्या शिवीगाळ करुन अटकाव करणार्‍याच्या कारची त्याने काच फोडली. तसेच घरावर लाथा मारुन दोन महिलांना अश्‍लील शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला.

याप्रकरणी प्रतीक संतोष दळवी (वय 22, रा. सातारा) याच्यासह त्याच्या अनोळखी तीन मित्रांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रतीक दळवी सध्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात रुजू आहे. याप्रकरणी महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.