शेते येथे एकाची आत्महत्या

शेते येथे एकाची आत्महत्या

सातारा : शेते, ता. जावळी येथे जंगलातील झाडास गळफास लावून घेत एकाने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विनोद बाळू मेंगळे (रा. शेते) यांनी खबर दिली आहे. त्यानुसार सुनील बाळू मेंगळे (वय ४२, रा. शेते) यांनी आत्महत्या केली आहे. हा प्रकार १७ एप्रिल रोजी घडला आहे. सुनील मेंगळे हे जळणासाठी लाकडे घेऊन येतो म्हणून निघून गेले होते. त्यानंतर शेते गावच्या हद्दीतील म्हसोबा देवाच्या मंदिराजवळच्या जंगलातील एका झाडास गळफास लावून घेतला. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गळफास घेतल्याचे दिसून आल्याने मेढा पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. पोलिसांनी नोंद केली आहे.