युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा

सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका वीस वर्षीय युवतीस उद्देशून असभ्य भाषेत संभाषण केल्याप्रकरणी मधुकर कदम (पूर्ण नाव माहित नाही) आणि सयाजी जनार्दन बल्लाळ दोघे रा. लिंब, ता. सातारा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.