सातारा : सातारा शहर परिसरात पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून तिघांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुगार प्रकरणी अजय सुमंत अरकडे (वय 28, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 1 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
दुसरी कारवाई विक्रम अनिल जमदाडे (वय 28, रा. मंगळवार पेठ) व ईश्वर सावंत (रा.सातारा) या दोघांवर झाली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख 1170 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई राजवाडा परिसरात करण्यात आली आहे.