वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा

वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा

सातारा : वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्‍यातील सेव्‍हन स्‍टार इमारतीजवळ वृध्द महिलेला दवाखान्‍यात घेवून जातो, असे खोटे सांगत दोन अज्ञातांनी सुमारे ६५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. वत्‍सला साहेबराव जाधव (वय ७४, रा. मल्‍हार पेठ, सातारा) यांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २६ नोव्‍हेबर रोजी घडली आहे. तक्रारदार महिला घाबरल्‍याने त्‍यांनी उशीरा तक्रार दिली आहे.