सातारा : 70 हजार रुपये किंमतीच्या ॲल्युमिनियम कंडक्टरची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान अंगापूर, ता. सातारा उपकेंद्रासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या 70 हजार रुपये किंमतीच्या ॲल्युमिनियम कंडक्टर ची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.