तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने युवकाचा मृत्यू

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने युवकाचा मृत्यू

सातारा : तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास निरंजन राजेश माने रा. मंगळवार पेठ, सातारा हा युवक बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून जखमी झाल्याने त्याला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.