सातारा : सोन्याच्या दुकानातून जबरी चोरी प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 21 हजार रुपये किंमतीचे सोन्याची कुर्णफुले विकत घेवून पैसे ऑनलाईन पाठवल्याचे भासवत तसेच पैसे मिळाले नसल्याचे व्यावसायिक महिलेने सांगताच हाताला धक्का देत कर्णफुलाची डबी जबरदस्तीने चोरुन नेली. देगाव येथील अमरलक्ष्मी चौकातील ब्रह्मचैतन्य ज्वेलरी शॉपमध्ये हा प्रकार दि. 6 रोजी घडला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात सुरेखा रामदास शिंदे (वय 38, रा. देगाव) यांनी फिर्याद दिली असून, फरिद बागवान (रा. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.