सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ग्राहक व साईशा टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचे मालक प्रविण बाळकृष्ण साळुंखे यांना बँकेच्या लिंब, ता. सातारा शाखेमार्फत नविन वाहन कर्ज योजनेअंतर्गत नविन ‘‘मारूती इर्टीगा’’ खरेदीसाठी कर्ज वितरण केले. वाहन वितरणाचा कार्यक्रम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे आदी मान्यवरांचे उपस्थितीत करणेत आला. साळुंखे यांना सदर कर्जास आणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्याज परतावा योजनेचा लाभ मिळणार असलेने कर्जदार यांना कर्जाचा व्याजदर 0 टक्के पडणार आहे.
गाडीचे वितरण प्रसंगी बोलताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले की, बँक जिल्ह्यातील शेतकरी व नवउद्योजकांना केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे़ जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, व्यवसायीक व उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक कटीबध्द आहे. जिल्ह्यात नवनविन व्यवसायीक तयार व्हावेत, रोजगार निर्मिती व्हावी व त्यातूनच सर्व सामान्यांची उन्नती होणेस्तव बँक सातत्याने प्रयत्नशिल आहे. बदलत्या काळानुसार बँकेने विविध कर्ज धोरणात सुधारणा करून नवनविन कर्ज धोरणांची आखणी केली आहे. माफक व्याजदरात शासनाच्या अनुदान प्राप्त व व्याज परतावा प्राप्त योजना बँकेने कार्यान्वीत केलेल्या आहेत. त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व समाजघटकांनी घ्यावा असे अहवान केले. यामध्ये बँक अनेकविध व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करत असून यामध्ये मराठा समाजातील उद्योजकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेतून शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कृत इतर जाती जमाती मधील सर्व घटकांसाठी व्याज परतावा योजनेतून व्यवसाय उभारणीसाठी कर्जे, मा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मा. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 25 ते 35 टक्के अनुदानीत कर्ज पुरवठा तसेच नविन दुचाकी व चारचाकी वाहन कर्ज योजना, व्यवसायासाठी कॅश क्रेडीट कर्ज, गृहबांधणीसाठी गृहसंकल्पपूर्ती कर्ज योजना, कंपोझीट लोन नं. 3 कर्ज योजना, किसान सन्मान कर्ज योजने अंतर्गत तात्काळ कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सोनेतारण कर्ज योजना, नोकरदार कर्मचार्यांसाठी सॅलरी पॅकेज कर्ज योजना इत्यादी अनेकविध कर्ज योजनांचे माध्यमातून किफायतशीर व्याजदराने कर्ज पुरवठा करत असून सदर योजनांचे माध्यमातून कर्ज व व्याज अनुदानाचा लाभ घेणेसाठी जवळच्या शाखेत संपर्क साधण्याचे अवाहन केले.
बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे म्हणाले, बँक सातारा जिल्ह्यातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कार्यरत असून किफायतशीर व्याजदर व सुलभ कर्ज पुरवठयाचा लाभ घेवून स्वत:बरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावण्याचे अवाहन केले. बँकेने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लहान व्यवसाईकांसाठी ‘‘अमृत आधार कर्ज योजना’’ कार्यान्वीत केली असून सदर योजना राज्य शासनाच्या मा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मा. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून अनुदान प्राप्त होत असलेने त्याचा लाभ घ्यावा, असे सुचित केले. तसेच आगामी काळात नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी हे सण येत आहेत. यासाठी नविन दुचाकी व चारचाकी वाहने खरेदीसाठी व विविध व्यवसायाच्या शुभारंभासाठी लागणार्या अर्थसहाय्यासाठी नजीकच्या शाखेत भेट देणेचे अवाहन केले.
याप्रसंगी बँकेचे व्यक्तीगत थेट कर्ज विभागाचे उपव्यवस्थापक संदीप वीर यांनी सर्वांचे आभार मानले व साईशा टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचे मालक प्रविण साळुंखे यांना पुढील काळात बँक आपणास व्यवसाय वृध्दीसाठी कायम सहकार्य करेल, असे आश्वासित केले. वाहन मालक प्रविण साळुंखे यांनी महाराष्ट्र शासन पुरस्कृत आण्णासाहेब पाटील व्याज परतावा योजनेतून बिनव्याजी तसेच कमीत-कमी कागदपत्रात अत्यल्प वेळेत तसेच बँकेची तत्पर सेवा व बँकेने कर्ज पुरवठा केल्याबद्दल बँकेचे आभार मानले.