पाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

पाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

सातारा : पाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 ऑगस्ट 2022 ते 25 एप्रिल 2023 दरम्यान मदन बाळकृष्ण सोनमळे रा. लिंब, ता. सातारा यांचा विश्वास संपादन करून अन्सार लालखॉं शेख रा. हादगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर यांनी ऊसतोड मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन सोनमळे यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.