गहाळ झालेले 60 मोबाइल सातारा शहर पोलिसांनी केले जप्त; 16 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

गहाळ झालेले 60 मोबाइल सातारा शहर पोलिसांनी केले जप्त; 16 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

सातारा :  सातारा शहरातून गहाळ झालेले 16 लाख 20 हजार रुपयांचे 60 मोबाइल शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपास करून, जप्त केले आहेत.

सातारा शहरात मोबाइल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी शहर पोलिसांना सूचित केले होते.त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पोलीस सीआयएसआर पोर्टल आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील मोबाइलधारकांशी वारंवार संपर्क करून, तपास मोहीम राबवली.

या मोहिमेत 60 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. हे मोबाइल मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे मस्के यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजीत भोसले, नीलेश जाधव, नीलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, तुषार भोसले, सुहास कदम, सायबर पोलीस ठाण्याचे संदीप पाटील, महेश पवार, ओंकार डुबल, रणजित कुंभार, यशवंत घाडगे, सुप्रिया रोमण, रेश्मा तांबोळी यांनी ही कारवाई केली.