सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह सासूविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती रोहित वारे व सासू जयश्री वारे (रा. माळेवाडी ता.पलूस जि.सांगली) यांच्या विरुध्द पल्लवी रोहित वारे (वय 20, रा.माळेवाडी सध्या. प्रतापसिंहनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 15 जून 2022 ते मार्च 2025 या कालावधीत जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.