नीमा रूरलअध्यक्ष पदी डॉ संजय नलावडे यांची बिनविरोध निवड
📅 30 Sep 2024, 12:12 PM
सातारा : नॅशनल
इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (नीमा) या अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेल्या
संघटनेच्या, सातारा
जिल्हा रुरल नीमा शाखेची वार्षिक सभा अत्यंत खेळिमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या सभेत पुढील दोन वर्षांसाठी तर डॉ विश्वजीत बाबर यांच्या कडे सचीव
पदाची धुरा सोपविण्यात आली. इतर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य
पुढीलप्रमाणे निवडण्यात आले.
डॉ शुभांगी गायकवाड, खजीनदार.
जाॅईंट सेक्रेटरीपदी, डॉ अभिराम
पेंढारकर व डॉ सुनिता चव्हाण, डॉ.
सुधाकर बेंद्रे, डॉ. माणिक
जाधव, डॉ.संदीप
निकम, डॉ.अभिजीत
मायने, डॉ.
श्रीपाद शिंदे, डॉ.
सारिका देशपांडे, डॉ. वर्षा
कुलकर्णी, याच सभेत खास निमंत्रित सदस्य डॉ.दयानंद घाडगे यांनी येऊ घातलेल्या नीमा रन
या उपक्रमाच्या वाटचालीची माहिती दिली. डॉ.माणिक जाधव यांनी मागील दोन वर्षातील
विविध उपक्रमांचा आढावा घेतला. संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकर बेंद्रे यांनी नवीन
कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या. मावळते अध्यक्ष डॉ.अनिल शिंगे यांनी आभार प्रदर्शन
केले.टाळ्यांच्या गजरात नवीन कार्यकारणीस शुभेच्छा देऊन सभा संपन्न झाली.