सातारा : दुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कास ते सातारा रस्त्यावर राहुल राणाप्रताप सिंग रा. रामनगर, कोपरखैरणे, नवी मुंबई आणि रोहित दादासो कवळे रा. चंदन नगर, कोडोली, सातारा हे दोघे दुचाकीवरून येत असताना राहुल याने त्याच्या ताब्यातील दुचाकी क्र. एमएच 43 सीएच 3081 बेदरकारपणे, भरधाव वेगात चालवून अपघात केला. या अपघातात रोहित कवळे हा जखमी झाला असून उपचारादरम्यान राहुल यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.