बनावट सही केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

बनावट सही केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

सातारा : सातारा पंचायत समितीतील ग्रामपंचायत अधिकार्‍यांची बनावट सही केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी महेश निलकंठ यादव (रा. सासपडे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. खेड,ता. सातारा येथील गोकर्णनगर बंदिस्त गटर कामाबाबत प्रशांत सत्यवान जाधव यांना कामाचा आदेश व अंदाजपत्रक मागणी पत्र दिले आहे. यावर पंचायत समितीतील ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत वसंत फडतरे यांची बनावट सही करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.