मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

सातारा : अल्पवयीन मुलास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील सिव्हिल हॉस्पिटल, एक्झिट गेट येथे संकेत विकास कीर्तीकर रा. आरेदरे, ता. सातारा यास मारहाण केल्याप्रकरणी आयुष चव्हाण व त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी चार ते पाच मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.