सातारा : आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ट्रेडबिक्स प्रिमियम ट्रेड ग्रुप या टेलिग्राम ग्रुपवरील कैलास नायक नावाच्या व्यक्तीने ’तुम्हाला ट्रेडिंग शिकवतो, प्रॉफीट करुन देतो’ असे सांगितले. त्यावरुन फिर्यादीने त्याला 47 हजार 200 रुपये पाठविले. ही रक्कम व नफा रक्कम खात्यावर न पाठवता एकाने फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सुरज भगवान जगदाळे (वय 34, रा. विकासनगर, खेड, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. 8 एप्रिलला नवीन एमआयडीसीमध्ये घडला.