महिलेस शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी दोनजणांवर गुन्हा

महिलेस शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी दोनजणांवर गुन्हा

सातारा : महिलेस शिवीगाळ करुन दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोनजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिलेला अश्लील शिवीगाळ करुन दमदाटी केल्याप्रकरणी शिवम राजेभोसले व प्रतापसिंह राजेभोसले (दोघे रा. गोडोली, सातारा) या दोघांविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 24 फेब्रुवारी रोजी घडली आहे.