फळांवर शो-शायनिंगसाठी नाही लावत स्ट्रीकर्स

फळांवर शो-शायनिंगसाठी नाही लावत स्ट्रीकर्स

फळं खरेदी करताना आणि ती ताजी आहेत की नाही किंवा त्यावर कोणता डाग तर नाही ना? या सगळ्याची आपण काळजी घेतो. पण फळांवरील स्टीकर आणि कोड याचा अर्थ काय? सामान्यपणे लोकांचा असं समज असतो की, ज्या फळांवर स्टीकर आहे ते फळ चांगल्या प्रतीचं असेल. पण फळ कापल्यावर अनुभव मात्र वेगळाच असतो. सामान्यपणे वाटणारा हा अर्थ अजिबात नाही. 

फळांवर असलेले स्टीकर आणि त्यामधील प्रत्येक कोडचा एक वेगळा अर्थ असतो. सफरचंद, संत्री यासारख्या फळांवर आढळणारे हे स्टीकर नक्की नक्की पाहा. यावर 4ने सुरु होणारे कोड असतात. तर काही फळांवर 8 या अंकाने सुरु होणारी 5  अंकी संख्या असते. या सगळ्या कोडचा अर्थ वेगवेगळा असतो. जो आपण आज या बातमीमध्ये तपासून पाहणार आहे. 

4 अंकाने सुरु होणारा कोड 

काही फळांवर 4 अंकाचा कोड असलेला स्टीकर लावला जातो. जसे की, 4023, 4987 यासारखे कोड असतात. या स्टीकरवरील कोडचा अर्थ असा असतो की, हे फळ कीटकनाशक आणि रसायनांनी पिकवलं गेलं आहे. यामध्ये पेस्टिसाइड्स भरपूर प्रमाणात असतात. ही फळे इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असतात. याचा अर्थ थेट असा होतो की, तुम्ही किटनाशक फवारलेली फळे खात आहात. 

8 अंकाने सुरु होणारा कोड 

काही फळांवर 5 अंकी कोड असतो ज्याची सुरुवात 8 या अंकाने होते. जसे की, 84732, 86427 सारखे कोड असतात. याचा अर्थ असा होतो की, या फळांमध्ये अनुवांशिक पद्धतीने संशोधन केले जाते. ही फळ ऑर्गेनिक नाहीत. किटनाशक फवारलेल्या फळांपेक्षा ही फळे थोडी महाग असतात. या फळांचे फायदे आणि नुकसान देखील आहेत. 

9 अंकाने सुरु होणारा कोड 

काही फळांमध्ये 9 या अंकाने सुरु होणारे 5 अंकी कोड असतात. याचा अर्थ असा आहे की, ही फळे पारंपरिक पद्धतीने पिकवली जातात. यावर कोणतेही किटकनाशके फवारलेली नसतात. ही फळे इतर फळांच्या दरापेक्षा जास्त महाग असतात. 

महत्त्वाची माहिती 

वरील माहिती खूप महत्त्वाची आहे. फळे खरेदी करताना या गोष्टींचा विचार करायला हवा. पण अनेकदा फळ या स्टीकरमध्ये फेरफार करताना दिसतात. त्यामुळे फळ खरेदी करताना ते विश्वासू फळ विक्रेत्याकडून खरेदी करणे महत्त्वाचे आहे.