सातारा : सातार्यात अल्पवयीन 17 वर्षीय मुलाने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडतेस,’ असे म्हणत मुलीचा रस्ता अडवून तिला घरात नेवून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना दि. 29 डिसेंबर रोजी घडली आहे. घडलेल्या घटनेनंतर मुलीने कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.