नेहमीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट बनवा खुसखुशीत दह्यातले धपाटे

नेहमीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट बनवा खुसखुशीत दह्यातले धपाटे

दिवसभर काम करून घरी आल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर बऱ्याचदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमीच तिखट तेलकट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाहीत. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा ब्रेड बटर खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही कमीत कमी वेळात दह्यातले धपाटे बनवू शकता. दही खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. कारण आहारात दह्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. लहान मुलं बऱ्याचदा भाकरी किंवा चपाती खाण्यास नकार देतात. त्यामुळे मुलांना आवश्यक पोषण मिळत नाही. अशावेळी मिक्स पिठाचा वापर करून बनवलेले धपाटे खावेत. चला तर जाणून घेऊया खुसखुशीत दह्यातले धपाटे बनवण्याची सोपी रेसिपी. 

साहित्य:

ज्वारीचे पीठ

गव्हाचे पीठ

बेसन

कांदा

मीठ

हिंग

ओवा

धणे जिरे पावडर

लाल तिखट

पांढरे तीळ

कोथिंबीर

कृती:

दह्यातले धपाटे बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या ताटात ज्वारीचे आणि गव्हाचे पीठ घेऊन एकत्र चाळून घ्या.

त्यानंतर त्यात अर्धा वाटी बेसन आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात लाल तिखट, हळद, धणे जिऱ्याची पावडर, गरम मसाला, पांढरे तीळ आणि आवश्यकतेनुसार कोथिंबीर घालून मिक्स करा.

तयार केलेल्या मिश्रणात दही घाला. सगळ्यात शेवटी त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालून मिक्स करा. आवश्यकता वाटल्यास धपाट्यांच्या पिठात पाणी घालावे.

पॅन गरम करण्यासाठी ठेवा. मोठे ताट उलटे करून त्यावर ओला केलेला रुमाल घालून पसरवून घ्या. त्यानंतर धपाटे थापून घ्या.

तयार केलेले धपाटे तव्यावर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले दह्यातले धपाटे. हा पदार्थ दही किंवा ठेच्यासोबत खाल्यास चव अतिशय सुंदर लागेल.